महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड
• शासन निर्णय :
1) शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक कार्य क्रीडा व पर्यटन विभाग क्रमांक बी. सी. एच. १०८२ / ९०३८५ (३८) बी.सी .डब्ल्यू. -४ दिनांक :- १६ मे १९८४
2) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक : बी.सी.एच.२०१० / प्र. क्र. -४३० मावक - ४ दिनांक :- २६ जुलै २०११
3) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक : खाबाप्र २०१२ प्र. क्र. ११६ / शिक्षण - २, दिनांक:- २ जुलै २०१२
• उद्दिष्ट:
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन १९२२ पासून कार्यान्वित आहे. सध्या महाराष्ट्र विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर ३८१ वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी ३७७ सुरू असून मुला-मुलींची ( मुलांची २१८ + मुलींची १६३ ) शासकीय वस्तीगृहे कार्यान्वित असून त्यामध्ये ३५५३० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.
• लाभाचे स्वरूप:
1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हाश इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.
अ .क्र |
अभ्यासक्रमाचा तपशील |
रक्कम |
१ |
वैद्यकीय व अभियांत्रिक |
रु. ७,५००/- |
२ |
कृषी |
रु.४,५००/- |
३ |
पशुवैद्यकीय |
रु. ५,०००/- |
४ |
तंत्रनिकेतन |
रु.२,४००/- |
५ |
सी.ए., एम.बी.ए. आणि विधी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ संच |
रु.५,०००/- |
अ.क्र. | शासकीय वसतिगृहाचे नाव | अधिक माहिती |
1 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धर्माबाद. | |
2 | मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, देगलूर. | |
3 | मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, भोकर. | |
4 | मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हदगाव. | |
5 | मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड. | |
6 | मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रायगडनगर नमस्कार चौक, एम.जी.एम कॉलेजच्या बाजुला (जुने),नांदेड ता.जि.नांदेड. | |
7 | मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरी. | |
8 | मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुखेड. | |
9 | मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हदगाव. | |
10 | मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भोकर. | |
11 | मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, उमरी. | |
12 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आनंद नगर, नांदेड. | |
13 | मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नायगाव. | |
14 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बिलोली गांधी नगर, बिलोली ता.बिलोली जि.नांदेड. | |
15 | मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अर्धापूर. | |
16 | मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नविन), नांदेड. |