महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


1.आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दि.28 मार्च 2013 अनुसार स्थित घरकुल बांधकामाचे चटई 269 चौ.फुट आहे.

2.आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दि.06 जानेवारी 2017 अनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत किमान भागाकरिता स्थित घरकुल अनुदान साधारण ₹ 1,20,000/- व निलंकत व डेंगराळ भागासाठी ₹1,30,000/- रूपये लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध आहे. तसेच शौचालय बांधण्यासाठी ₹12,000/- ची स्थितपुर्ती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने करावी असा निर्णय घेण्यात आला.

3.आदिवासी विकास विभाग शासन निर्णय घरकुल-2016/ज.37/का.17 दि.15 मार्च 2016 अनुसार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी असून ग्रामसभा माफत प्राप्त लाभार्थ्यांची निवड करून घरकुलाचा लाभ दिला जातो. तत्पश्चात लॉटांकी रक्कम राज्य पर्यवस्थांक कडे वगळ केली जाते.

4.आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दि.06 फेब्रुवारी 2017 अनुसार आदिम जमाती विकास कार्यक्रमाखाली मंजूर केलेली घरकुल शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या निकषानुसार बांधणेबाबत निर्णय घेण्यात आला.

5.ग्रामीण विकास विभाग शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2017 अनुसार "पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अथवा सहायक योजना" सुच केली आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल प्राप्त परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी ₹50,000/- पयेत अथवा सहायक उपलब्ध करून दिली जातील, असा निर्णय घेण्यात आला.

वर्ष जिल्हा मंजूर लक्षांक पूर्ण घरकुल काम प्रगतीपथावरील घरकुल शेरा
2021-22रायगड47840474घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
2022-23रायगड000
2023-24रायगड000
2021-22रत्नागिरी853घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
2022-23रत्नागिरी000लक्षांक अप्राप्त
2023-24रत्नागिरी000लक्षांक अप्राप्त
2021-22सिंधुदुर्ग1301313 चे शासनास घरकुल समर्पित करणे बाबत कळवले आहे.
2022-23सिंधुदुर्ग000
2023-24सिंधुदुर्ग000
वर्ष जिल्हा मंजूर लक्षांक पूर्ण घरकुल काम प्रगतीपथावरील घरकुल शेरा
2021-22रायगड54752621घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
2022-23रायगड22011468733घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
2023-24रायगड26394942145घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
एकूणरायगड538724882899
2021-22रत्नागिरी59554
2022-23रत्नागिरी100283042 चे शासनास घरकुल समर्पित करणे बाबत कळवले आहे.
2023-24रत्नागिरी220
एकूणरत्नागिरी1618534
2021-22सिंधुदुर्ग110
2022-23सिंधुदुर्ग208210 चे शासनास घरकुल समर्पित करणे बाबत कळवले आहे.
2023-24सिंधुदुर्ग000
एकूणसिंधुदुर्ग2192

या आदिवासी योजने अंतर्गत राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात असे अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याला शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

१. अनुसूचित जमातीचा असावा.
२. स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे.
३. महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षांपासून रहिवासी असावा.
४. घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
५. यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
६. वय वर्ष १८ पूर्ण असावे.
७. स्वतःच्या नावाने बँक खाते असावे.
घरकुलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९.०० चौरस फूट एव्हडे राहील. वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रु. ३.०० लाख पर्यंत असावी. घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही २.५० लक्ष एव्हडी राहील. सदर अनुदान रक्कम ही खालील प्रमाणे ४ टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
अनु क्रमांक टप्पा रक्कम
1घरकुल मंजुरी40000
2प्लिंथ लेवल80000
3लिंटल लेवल80000
4घरकुल पूर्ण50000
१. अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
२. रहिवासी प्रमाणपत्र
३. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
४. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा
५. उत्पन्नाचा दाखला
६. शिधापत्रिका
७. आधार कार्ड
८. एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
(फोटो व खाते क्रमांक असलेले) इथे विहित केलेला अर्ज व कागद पत्रे ही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे सादर करावा. १. जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती
२. ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार पीडित व्यक्ती
३. विधवा किंवा परितक्त्या महिला
४. आदिम जमातीची व्यक्ती