महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


अनुसूचित जमातीचे लाभार्थी हे दर्या डोंगरात राहत असल्याने त्यांच्या कडे उपजीविकेचे साधन हे शेती, मासेमारी व मोलमजुरी मुख्य व्यवसाय आहे. सदरचा शेती हा व्यवसाय पावसावर अवलंबून असल्याने व इतर मोलमजुरी करून देखील त्यांना उत्पन्न मिळत नसल्याने भाजीपाला व्यवसायासाठी / लागवडीसाठी अनुदान दिल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच त्यांना अर्थसाहाय्य दिल्यास त्यांना सदरचा व्यवसाय करून उपजीविकेसाठी दुय्यम व्यवसाय उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांची प्रगती होण्यास मोलाची मदत होणार आहे. या योजनेसाठी या कार्यालयाची निर्देश समितीने लाभार्थ्यांची निवड केलेली आहे सदरची योजना लाभार्थ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास उपयुक्त आहे.

१ लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा
२ उक्त योजनेकरिता लाभार्थ्यांची स्वतःची जमीन असावी किंवा भाजीपाला व्यवसाय करीत असल्याचे हमीपत्र आवश्यक आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन जिल्हा रायगड हे योजनेची मंजूर रक्कम आहारीत करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर DBTद्वारे थेट जमा करतील. भाजीपाला व्यवसाय किंवा लागवड केल्यानंतर या कार्यालयातील आदिवासी विकास निरीक्षक /शासकीय कर्मचारी यांचा स्थळपाहणी अहवाल प्राप्त करून १०० टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.